जिल्ह्यात १५ केंद्रावर आज होणार "नीट" परीक्षा! ५१९५ जणांची डॉक्टर होण्यासाठी धडपड

 
pariksha
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बारावीनंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी नीट परीक्षा आज, १७ जुलै रोजी पार पडणार आहे.

जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्रावर ५१९५ विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सरकारी मेडिकल  कॉलेजला प्रवेश दिल्या जात असल्याने या परीक्षेचे वेगळे महत्व आहे. आज दुपारी दोन ते साडेपाच या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे.

बुलडाणा शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सहकार विद्या मंदिर, शारदा ज्ञानपीठ बुलडाणा, एडेड हायस्कूल बुलडाणा,  सेंट जोसेफ हायस्कूल बुलडाणा, खामगाव येथील सरोजबेन दामजीभाई  विकमशी ज्ञानपीठ, सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकर, स्कूल ऑफ स्कॉलर मलकापूर, पंकज लद्धड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येळगाव, भारत विद्यालय बुलडाणा, प्रबोधन विद्यालय बुलडाणा, शिवसाई युनिव्हर्सल जूनियर कॉलेज बुलडाणा, सेंट्रल पब्लिक स्कूल लोणार या परीक्षाकेंद्रावर कडेकोट बंदोबस्तात ही परीक्षा पार पडणार आहे