'माझं मत, माझी ताकद'! बुलडाण्यात असा साजरा झाला राष्ट्रीय मतदार दिवस!जिल्हाधिकारी डॉ. तूम्मोड म्हणाले..

 
Tgui
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  लोकशाहीतील मताचा अधिकार प्रत्येक नागरिकांच्या मनगटातील सामर्थ्य आहे. मताच्या पेटीतून शासनाचा जन्म होतो. मतदानाने सार्वभौम गणराज्याची मूहुर्तमेढ मजबूत बनते. गणराज्याला बळकटी देणे मतदानाचा गाभा असून मतदान लोकशाहीचा डोलारा उभा करते. मतदान नोंदणी ही निरंतर प्रक्रिया असून १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक -युतीने या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. एच पी तूम्मोड यांनी केले. बुलडाणा येथील समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज 'माझं मत माझी ताकद' अशी शपथ देण्यात येऊन पथनाट्याद्वारे जागर करण्यात आला.

  अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारी रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील सर्व ५२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. दरम्यान २५ जानेवारीला जिल्हाधिकारी तूम्मोड यांनी जनजागृतीद्वारे राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला. येथील समाजकार्य महाविद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना, १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींना मतदान नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केले. प्रत्येक निवडणुकीत मी मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजावेल,'माझं मत माझी ताकद' अशी प्रतिज्ञा ही यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत, तहसीलदार रुपेश खंडारे, नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते व विविध विभागातील अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.