अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी चिखलीच्या आमदार श्वेताताई आल्या धावून! म्हणाल्या कोणतीही अडचण आल्यास....

 
mahale
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या आमदार श्र्वेताताई शेतकरी बांधवांच्या अडचणींच्या प्रसंगी नेहमी त्यांच्यासोबत असतात. जिल्हा जिल्हाभरासह चिखली विधानसभा क्षेत्रातही अतिवृष्टीने थैमान घातले आहे. या काळातही आमदार श्वेताताई शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार श्वेताताईंनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झालेल्या नुकसानीसंदर्भात तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन द्यावे. तसेच याबतीत कोणतीही अडचण उद्भवल्यास चिखली येथील जनसेवालय या त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार श्वेताताईंनी केले आहे.  याबाबतीत फोनवर सुद्धा शेतकऱ्यांना त्यांची अडचण सांगता येणार असून त्यासाठी आमदार श्वेताताई यांचे स्विय सहाय्यक सुरेश इंगळे ९०२१७९९१११ व चंद्रकांत काटकर ९४२२९४०३४० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.