चिखलीचे एक्झाम वॉरियर्स महाराष्ट्रात अव्वल! आ. श्वेताताई महाले म्हणाल्या...'कठोर परिश्रमाने पास करा आयुष्याची परीक्षा!'

 
gvn
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या माध्यमातून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या एक्झाम वॉरियर्स चित्रकला स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येने सहभागी होण्याचा विक्रम चिखली विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी नोंदविला आहे. २४ शाळेतील ६८०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेला उस्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान परीक्षा कोणतीही असो, जिद्द चिकाटी आणि मेहनत अंगी असावी लागते. अभ्यासाशिवाय कुठलीच परीक्षा पास करता येत नाही. आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असल्याचे प्रेरक विचार आमदार श्वेताताई महाले यांनी या उपक्रमा संदर्भात व्यक्त केले.

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या संकल्पनेतून  एक्झाम वॉरियर चित्रकला स्पर्धा व्यापक स्वरूपात राबविली. महाराष्ट्रात या परीक्षेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. चिखली विधानसभा मतदारसंघात एक्झाम वॉरियर्स चित्रकला स्पर्धेने महाराष्ट्रातून सर्वाधिक संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचा विक्रम केला आहे. २४ शाळेतील ६८०० विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. स्पर्धेसाठी २२६३१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. बुलडाणा जिल्ह्यातून ५६६३ व चिखली विधानसभा मतदारसंघातून ४११० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तसेच २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी यायला नेत्यांनी नोंदणी न करता परीक्षा दिली आहे.

आमदार श्वेताताई महाले यांनी स्वतः आदर्श विद्यालयात जाऊन चित्रांची पाहणी केली तसेच त्यांच्याशी हितगुज सुद्धा साधले.परीक्षेच्या यशस्वीतेसाठी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ,  सुनील देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे, देविदास जाधव पाटील, संजय महाले, सागर पुरोहित, सुहास जामदार, विनोद सीताफळे, बंडू अंभोरे, प्रशांत पाखरे, शंकर तरमळे, डॉ राजेश्वर उबरहंडे, डॉ तेजराव नरवाडे, विष्णू वाघ, संदिप उगले आदींनी पुढाकार घेतला.