कोरोनाबाबत बुलडाण्यात मॉक ड्रिल!ऑक्सीजन उत्पादन यंत्राचा घेतला आढावा

 
uyty
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चीनमधील कोरोना  उद्रेकानंतर केंद्र सरकार खबरदारीची पाऊलं उचलंत आहे. चीनमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज, २७ डिसेंबर रोजी बुलडाण्यात मॉक ड्रिल करण्यात आले. रुग्णालयांमधील ऑक्सिजन उत्पादन यंत्रांसह आरोग्य सुविधांबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे.

  आज सर्व महत्वांच्या रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे, असे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिले होते. कारण जगभरातील काही देशांमध्ये कोविड संसर्ग  वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. असं असताना भारतात देखील सतर्कता बाळगली जाऊ लागली आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशभरातील सर्व आरोग्य सुविधांची पडताळणी करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. बुलडाण्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सचिन वासेकर यांनी मॉक ड्रिल व ऑक्सिजन उत्पादन यंत्रासह आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.