'मौसम मस्ताना.. गरज नसताना!'आणखी ३ दिवस गारठा! काय म्हणाले हवामानातज्ञ?

गुरुवारी ५ जानेवारीला जिल्ह्याने धूक्याची शाल पांघरली होती. वातावरणातील गारवा वाढला होता.१३.२ एवढे तापमान होते. काही ठिकाणी पावसाचे तुरळक थेंब टपटपले.भर दिवसा शेकोट्या पेटल्यात. मौसम अगदी मस्ताना झाला होता. वातावरणात सातत्यानं बदल होत आहे.कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण रब्बी पिकांवर संक्रांत ठरत आहे.
विशेषता तूर, हरभऱ्यांवर किडींचा प्रादुर्भाव पसरला आहे. मिरची, वांगे ह्या फळभाज्या धोक्यात आहेत.या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून,सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास वाढत आहे.
हवामानातज्ञ म्हणतात...
जिल्ह्यात आज शुक्रवारी १३.३ एवढे तापमान आहे. ८,९ व १० जानेवारीपर्यंत तापमान १० डिग्री सेल्सियस खाली येऊ शकते. केवळ किमानच नाही, तर बुलडाणासह राज्यात कमाल तापमानातही घट होऊ शकते. सर्वत्र थंड वारे वाहत असल्याने हा गारवा निर्माण झाल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे हवामान तज्ञ मनेश यदुलवार म्हणाले.