राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेच्या माटरगाव शाखेचा शुभारंभ! सुनील शेळके म्हणाले,राजर्षी शाहू विश्वासाचा ब्रँड; व्यवसायाद्वारे केवळ नफा मिळवणे हा राजर्षी शाहू पतसंस्थेचा उद्देश नाही, तर...

शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे आज १६ डिसेंबर रोजी राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या नूतन शाखेचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगटाच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके होत्या. मंचावर माजी जि. प. अध्यक्षा वर्षाताई वनारे, माजी सभापती सुरेश वनारे, राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, मुक्तीधाम समितीचे अध्यक्ष वविभाऊ खुटाफळे, माजी जि. प. सदस्य अनंतराव आळशे, स्वातीताई देवचे, माजी पं. स. सभापती भगवान भोजने, माधुरीताई मिरगे, राधाकिशन मिरगे, माजी प. स. सदस्य जुगळसेठ गांधी, पं. स. सदस्य इनायतउल्लाह खाँ, माजी पं. स. सभापती नीळकंठ पाटील, सरपंच श्रीकांत तायडे, माजी सरपंच राधाबाई टिकार, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल देशमुख, पोलीस पाटील भगवान आखरे, दिलीपसेठ गांधी, नागोराव मिरगे, गोपाळराव मिरगे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा ज्योतीताई जगताप, ग्रा. पं. उपसरपंच विद्याताई शेगोकार, प्रतीक मिरगे, मनोज वाघ, विजय वाघ, अनिल गुळभेले, ज्ञानदेव लोड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सुनील शेळके म्हणाले, केवळ व्यवसाय करणे आणि त्याद्वारे नफा कमावणे हा राजर्षी शाहू पतसंस्थेचा उद्देश नाही. संस्थेचे अनेक सामाजिक उपक्रम आहेत. यामाध्यमातून सोशल बँकिंगची संकल्पना राबवण्यात येते. शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिकांना न्याय देण्यास संस्थेचे प्राधान्य राहिले आहे. संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके आणि राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आपल्या कार्यशैलीने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. येत्या काळातही राजर्षी शाहू परिवाराची सामाजिक बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलतांना दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, माटरगाव येथे १३५ महिला बचतगट आहेत. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळात बचतगटांच्या महिलांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिक्षण आरोग्य, उद्योग, लग्नकार्य, कौटुंबिक गरजा अशा कुठल्याही कामासाठी त्यांना राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करण्यात येईल, असे अभिवचन त्यांनी दिले. इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश महाजन यांनी केले. संचलन राम देशमुख यांनी तर आभार भारती कोल्हे यांनी मानले.