मकसंक्रांती स्पेशल..! वाचा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांची कविता! ते वाजवतील पुंगी, पेटाऱ्यातूनच डोला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
Jan 15, 2023, 18:32 IST
तिळगुळ घ्या,
गोड गोड बोला..
ते वाजवतील पुंगी,
पेटार्यातूनच डोला !
बोललात जर कडू,
तर सीबीआय-ईडी..
इकडे नाही आलातर,
टाकू धडाधड धाडी !
संविधान फक्त भाषणात,
ते म्हणतील तो कायदा..
तुमच्या खिशातून काढून,
अंबानी-अदाणीचाच फायदा !
गुळ त्यांचा-तीळ तुमचे,
फेसबुक-इंस्टावरच रहा दंग..
उडून जास्त फडफडलातर,
काटून फेकतील तुमचे पतंग !