खासदार जाधवांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल! नेटकऱ्यांच्या कमेंट्स ला वैतागले! फेसबुकवरून कमेंट बॉक्स हटवला!

fgbhnjk
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव शिंदेगटात सामील झाल्यानंतर आता जिल्ह्यात परतले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसैनिकाकडून त्यांचे  जंगी स्वागत होत असले तरी सोशल मीडियावर मात्र काही नेटकरी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. खा. प्रतापराव जाधव यांच्या फेसबुक खात्यावर नेटकऱ्याकडून होत असलेल्या कमेंट्स ला खा.जाधव चांगलेच वैतागल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज ,२३ जुलै रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास खा. जाधवांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक प्रोफाईल वरून कमेंट करण्याचा पर्याय हटवला आहे.

खा. प्रतापराव जाधव यांनी आज दुपारी मेहकरात कार्यकर्त्यांना संबोधित घेतले. त्यावेळी त्यांचे भाषण त्यांच्या फेसबुक पेजवरून लाइव्ह दाखवण्यात येत होते. मात्र काही नेटकऱ्यांनी त्यांच्या निर्णयावर सडकून टीका करणाऱ्या कंमेट केल्या. काहींनी किती मिळाले असा प्रश्न केला तर काही साहेब तुमचा निर्णय  चुकलाच अशा कंमेट करीत होते तर काही नेटकऱ्यांनी अगदी खालच्या थरावर जाऊन कमेंट केल्या. त्यामुळे खा . प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईल वरून कमेंट करण्याचा पर्याय हटवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या फेसबुक प्रोफाईल वरून कमेंट करण्याचा पर्याय हटवला आहे हे विशेष!