वीज पडून मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाना आमदार श्वेताताईंच्या हस्ते चार लाख रूपयांचा धनादेश प्रदान

 
jhgyh
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा तालुक्यातील  रुइखेड मायंबा येथील  स्व. देवराव देउबा सोनुने हे शेतात काम करत असताना  वीज पडून जागेवरच त्यांचा मृत्यु झाला होता.  त्यांच्या कुटुंबीयांना चार लाखाच्या आर्थिक मदतीचा धनादेश आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

 रुइखेड मायंबा येथे दि २० ऑक्टोबरला   देवराव देउबा सोनुने यांचे वीज पडून आकस्मिक दुःखद निधन झाले होते. यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. त्यांच्या पश्चात पत्नी , चार मुली व आई असा परिवार आहे.  त्यांच्या कुटुंबीयांना नैसर्गिक आपत्ती निधी बुलडाणा तहसील अंतर्गत आमदार श्वेताताईंच्या हस्ते ४ लक्ष रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला.या वेळी बुलडाणा संदीप पाटील उगले, उपसरपंच कौतिकराव ओलेकर, गुलाबराव किलबिले, कौतिकराव पाटील, साहेबराव उगले, नारायण उगले, ज्ञानेश्वर तांगडे, संदीप किलबिले, गजानन सोनुने, विजय उगले , विनोद सोनुने, मनोज उगले, नायब तहसिलदार श्री. डब्बे,  तलाठी श्री. गवळी, मंडळ अधिकारी श्री. राऊत व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.