पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान! आमदार डॉ. शिंगणेचे अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले स्वतः फिल्डवर उतरून पंचनामे करा..!!

 
rajendra shingne
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या दोन दिवसांपासून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या अगदी हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करावे असे निर्देश आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरेगाव, पिंपळगाव सोनारा, शिंदी, गुंज, शेंदुर्जन, सायाळा, लिंगा, पांगरी काटे, तांदुळवाडी, जागदरी, राजेगाव, बाळसमुद्र या गावांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबल्याने सोयाबीन सडले असून कपाशी, भाजीपाला या पिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले. या संदर्भात आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. अधिकाऱ्यांना  स्वतः बांधावर जाऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले.