बिबट्या घाटावर अन् घाटाखाली! जनावरांचा फडशा, शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी

 
chitta
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घाटावर आणि घाटाखाली असे बुलडाणा जिल्ह्याचे दोन भाग आहेत. या दोन्ही भागात बिबट्या म्हणा की वन्यप्राणी ते पशुपालकांच्या पाळीव जनावरांचा फडशा पाडत आहेत. हे वन्य प्राणी लगतच्या खेडेगावातील पशुधनावर ताव मारीत असून शासकीय मदत मात्र कोसो दूर असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे.

        budhvat

                    (जाहिरात👆)

जंगलव्याप्त बुलडाणा जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरू आहे. भीतीचे वातावरण पसरविणारा बिबट्या कधी राजुर घाटात दिसतो तर कधी बोथा घाटात आढळून येतो. बिबट्यांचे दर्शन नेहमीचेच झाले आहे. परंतु घाटावर आणि घाटाखालील काही भागात बिबट्याचा सुळसुळाट वाढत असल्याचे चिंताजनक बतमी आहे. बिबट्याने अनेक पाळीव जनावरे फस्त केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याने गाय, म्हैस, वासरू, बकरी यांची शिकार केली आहे. तर अनेक घटना शेतकऱ्यांच्या जीवावर बेतल्या. अस्वलांचे अनेक हल्ले झालेत. अनेक ठिकाणी शेतकरी, शेतमजूर जीव मुठीत घेऊन शेतात काम करायला जातात.

मलकापूर नांदुरा तालुक्यातील सीमेवर पिंपळखुटा खुर्द, लासुरा व निमखेड आधी गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शेतकरी अनंत सिताराम इंगळे यांनी यासंदर्भात तक्रार नोंदविली. त्यांच्या मालकीचे बैल व बकरींची शिकार झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. पुन्हई येथील शेतकरी दगडू सुरडकर यांच्या शेतातील गाईवर बिबट्याने हल्ला केल्याची तक्रार आहे. शिरवा येथील शेतकरी दिलीप दिवाने यांच्या गोठ्यातील वासरी वन्यप्राण्याने ठार केली. अंतर येथील राजेंद्र पाटील यांच्या शेतातील बैल बिबट्याने ठार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशा घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, वनविभाग केवळ पंचनामा करून मोकळा होत आहे. जनावरांची नुकसान भरपाई म्हणून शासकीय मदत देखील कोसो दूर राहत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.