एलसीबीचे "बाते कम,काम ज्यादा!" ५ दिवसात ६ ठिकाणी ११ लाखाचा मुद्देमाल हस्तगत !

 
Buldana
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  नवीन वर्षात स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी प्रमुखपदी नव्याने नियुक्त झालेल्या अशोक लांडे यांनी कारवाईचा धडाका लावला.२०२३ या वर्षातील ११ ते १५ जानेवारी दरम्यान  जिल्ह्यातील शेगाव, चिखली,खामगाव,रायपूर, हिवरखेड, देऊळगाव राजा या ६ ठिकाणी विविध कारवाईत ११ लाख ४५ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी जिल्हा पोलीस दलाचा पदभार घेतल्यापासून त्यांनी अवैध धंदे व गैरप्रकारचे समोर उच्चाटन करण्याचे योजिले. त्यांच्या मार्गदर्शनात नव्याने रुजू झालेले एलसीबी प्रमुख अशोक लांडे देखील "बाते कम,काम ज्यादा" या पद्धतीने  कामास लागले. अवैध दारू,वरली मटका, प्रतिबंधित गुटखा, गांजा, अमली पदार्थावर कारवाईचा बडगा उगारला. ११ जानेवारीला शेगावात १० किलो गांजा जप्तीची कारवाई झाली. आरोपी शहजाद खान फिरोज खान (२६) रा. अहमदाबाद गुजरात याच्याकडून १,२०,००० रुपयांचा गांजा पकडण्यात आला. दुसरी कारवाई चिखलीत वरली मटक्यावर झाली. १०,५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, आरोपी अनंत सपकाळ रा. तंबुळवाडी चिखली याला ताब्यात घेण्यात आले. १२ जानेवारीला खामगाव शहरातही वरली अड्ड्यावर कारवाई झाली.४१५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी प्रमोद बिस्सा रा. खामगाव याला ताब्यात घेण्यात आले. रायपूर हातभट्टीवर छापा मारून १२८०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी युसुफ बेर्डे, शेर खा बाबुल खा रा. जामठी बुलडाणा यांच्यावर कारवाई करण्यात आली.१३ जानेवारीला हिवरखेड येथे दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करून आरोपी शुभम गायगोल रा. काळेगाव, खामगाव त्याला ताब्यात घेऊन १६५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच ६३५५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा हस्तगत करण्यात आला. आरोपी शेख इरफान शेख गुलाब नबी याला अटक करण्यात आली. खामगाव देखील ९१८००० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. सज्जाद खान अयाज खान, मोहम्मद इलियास रा. खामगाव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एलसीबीच्या या कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.