क्रांती नाना मळेगावकरांच्या 'तळ्यात मळ्यात'ची बुलडाणेकरांना उत्कंठा! न्यू होम मिनिस्टर(खेळ पैठणीचा) कार्यक्रम रंगणार २४ जानेवारीला; राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांचे आयोजन

राजर्षी शाहू परिवाराची नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका राहिली आहे. नवनवीन उपक्रम राबवून या परिवाराने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सहकार, शिक्षण, कृषी, कला, क्रीडा, साहित्य, महिला बचतगट अशा सर्वच क्षेत्रात शाहू परिवाराचा वावर आहे. येत्या २४ जानेवारी रोजी महिलांसाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) हा कार्यक्रम रंगणार आहे. गप्पा-गोष्टी, रंजक खेळ, उखाणे, गीत, नृत्य, विनोद अशी भक्कम मेजवानी असणार आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी आहेत बक्षिसे
विजेत्या तीन स्पर्धकांना बक्षिसे मिळणार आहेत. प्रथम पारितोषिक फ्रीज, द्वितीय एलईडी टीव्ही तर तृतीय पारितोषिक वाशिंग मशिन आहे. तसेच मानाच्या पाच पैठण्या ठेवण्यात आल्या आहेत. कोणत्या स्पर्धकास कोणते बक्षीस मिळते, मानाची पैठणी कोण पटकावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सहभागी प्रत्येक महिला स्पर्धकास आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.
लावणी क्वीन विजया पालव राहणार आकर्षण
लावणी क्वीन विजया पालव यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महिलांकरिता त्या खास लावणी पेश करणार आहेत. त्यानिमित्ताने महिलांना विजया पालव यांच्यासोबत लावणी नृत्य करण्याची, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे.