जिजाऊ सृष्टीचा विकास होणार! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा तीनदा उल्लेख

 
Gulabrav
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राष्ट्रमाता जिजाऊ सृष्टीच्या विकास आराखड्यासाठी शासन मागील आणि या काळातही कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या सिंदखेडराजा या जन्मस्थळाचा विकास होणार, होणार आणि होणारच, असा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्रिवार उल्लेख करीत जिजाऊ भक्तांना आश्वासित केले.

आज राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रसार माध्यमांसमोर बोलत होते.

माध्यमांनी सिंदखेडराजा विकास आराखड्याचा प्रश्न उपस्थित केला असता, ते मोजक्या शब्दात उत्तर देऊन मोकळे झाले.पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की,आज राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी इथे हजारोंच्या संख्येने जिजाऊ भक्त उपस्थित झाले.ही राजमाता जिजाऊंच्या उपकारांची फलश्रुती आहे.ज्या राजमाता जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा दिली. त्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याचा मी पालकमंत्री झाल्याने स्वतःला भाग्यशाली समजतो, असे म्हणत त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली.