जानेफळचे सपोनी राहुल गोंदे मुख्यालयात! काय आहे नेमके कारण?

 
rahul

जानेफळ ( अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खाकी वर्दी मिळाली की, 'हम करे सो कायदा' या प्रमाणे काहीजण वागतात. हे वर्दीधारी वरिष्ठांना सुद्धा दुर्लक्षित करतात. जानेफळ येथील ठाणेदार वादग्रस्त ठरत असल्याने त्यांची बुलडाणा मुख्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बदली केली आहे. खरे तर नवे जिल्हा पोलीस अधीक्षक आले की बदली सत्र सुरू होते. त्यातील हा प्रकार आहे किंवा आणखी काही याबाबत चर्चा सुरू आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जानेफळ पोलीस स्टेशनचे सपोनी राहुल गोंदे यांना आदेश दिला की, 'प्रशासकीय कारणास्तव त्वरित बुलडाणा नियंत्रण नियंत्रित कक्षाला संलग्न व्हा!.. या आदेशाने जानेफळात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले. त्यांच्या जागी डोणगाव येथील  सपोनी निलेश अपसुंदे यांच्यावर कार्यभार सोपविला आहे.

परंतु राहुल गोंदे यांची बदली का झाली याबाबत चर्चा झडत आहेत.जानेफळ शहरात सुरू असणारे अवैध धंदे व आठवडी बाजारात खुलेआम दारू विक्री, ऑनलाइन चक्री मुळे  नागरिक व महिलांना होणारा त्रास यासर्व  तक्रारीची ओरड होत होती. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन जानेफळच्या ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले होते. दरम्यान जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत सुरु असणारे अवैध धंदे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी माहिती पडताळून पाहण्यासाठी दोन दिवस अगोदर जानेफळात अवैध धंद्यावर कारवाई केली. त्यामुळे सपोनी राहुल गोंदे यांची  बदली करण्यात आल्याचे बोलण्यात येत आहे.