याला म्हणतात वाढदिवस! भाजप नेते विष्णु पाटिल घुबे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

 
ghube
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपचे चिखली तालुका उपाध्यक्ष विष्णु पाटिल घुबे यांच्या वाढदिवसा निमित्य उद्या मेरा खुर्द जिल्हा परिषद सर्कल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 उद्या १० जानेवारी २०२३ रोजी अंचरवाडी येथील श्री गणपती मंदिरात सकाळी ९ वाजता चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीशजी गुप्त व सौ ज्योत्सनाताई गुप्त यांचे हस्ते श्री. गणेश पुजन व उपस्थित मान्यवरांना प्रसाद वाटप होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सौ. श्वेताताई महाले पाटील व प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपचे माजी बुलडाणा जिल्हा अध्यक्ष धृपतराव सावळे, सिंदखेड राजा विधानसभेचे माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, महाराष्ट्र भाजपा प्रवक्ते विनोद वाघ, सिंदखेड राजा विधानसभा प्रमुख डॉ. गणेश मांटे बुलढाणा जिल्हा भा. ज. पा. उपाध्यक्ष अंकुशराव पडद्यान, चिखली शहर भाजपा अध्यक्ष पंडितराव देशमुख, भाजपा युवा मोर्चा चिखली तालुका अध्यक्ष संतोष काळे, राजे संभाजी पतसंस्था
चिखलीचे अध्यक्ष शिवराज पाटील पडघान, धनश्री अर्बनचे अध्यक्ष बाळुशेट कोठारी, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे शेख अनिस उपस्थित राहणार आहेत.

 त्यानंतर देऊळगाव घुबे येथे मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोबतच मेरा जि. प. सर्कल मधिल सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधिल विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात येणार आहे .  सकाळी ११ वाजता जिवनधारा ब्लड बॅक बुलडाणा यांचे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून डॉ. मंगेश मिसाळ हे यावेळी मोफत रुग्णतपासणी करणार आहेत. सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन बुलडाणा जिल्हा भाजपा उपाध्यक्ष डॉ.प्रतापसिंग राजपूत यांचे हस्ते होणार आहे. कुटूंबाचा कर्ता पुरुष, अपघातात मरण पावलेल्या मुरादपूर येथिल स्व. प्रकाश गाडेकर, शेळगाव आटोळ येथिल स्व. गोविंदा हटकर, भरोसा येथिल भौतम सुदाम जाधव यांच्या कुटुंबियांना एक महिना किराणा कीट देखील वाटप करण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मेरा खुर्द जिल्हा परिषद सर्कल मधील भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.