अन् बुलडाण्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर आली स्वतःच्या कार्यालयाचे कुलूप तोडण्याची वेळ..!

 
ghn
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज, ३० मे रोजी जरा अजबच प्रकार पहायला मिळाला.. शिपाई वेळेवर कार्यालयात न पोहचल्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा दरवाजा तोडून उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहचावे लागले.
त्याचे झाले असे की बुलडाणा येथील उपविभागीय अधिकारी श्री. हांडे सकाळी ११ वाजता कार्यालयात पोहचले. मात्र कार्यालय बंद होते. ज्या शिपायाकडे कार्यालयाची किल्ली होती त्या शिपायाचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे आता करावे असा प्रश्न उपस्थित साऱ्यांनाच पडला. अखेर तिथे उपस्थित सर्वांचेच कार्यालयाचे कुलूप तोडणे हाच यावरचा उपाय असल्याचे एकमत झाले. त्यामुळे दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले. शिपाई हजर न झाल्याने  कुलूप तोडण्याची वेळ उपविभागीय अधिकाऱ्यांवर आली.