सरकार खरेच शेतकऱ्यांचे हित जोपासतेय का? शेतमालाच्या वायदे बाजारबंदी विरोधात शेतकरी संघटनेचे बुलडाण्यात धरणे आंदोलन

 
hyggg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सरकार खरेच शेतकऱ्यांचे हित जोपासतेय का? असा गोचीड  प्रश्न रुतलेला आहे. यासंदर्भात बुलडाणा जिल्हा शेतकरी संघटनेने शेतमालाच्या वायदे बाजार बंदी विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

केंद्र सरकारने सोयाबीन, तूर,हरभरा,गहू यासह ९ पिकांवर लावलेली वायदा बाजार बंदीची डिसेंबर २०२३ ची मुदतवाढ रद्द करावी, कापसावरील वायदे दर बंदी मागे घेण्यात येऊन, तात्काळ वायदे सुरू करावे, अशी मागणी जिल्हा शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासना मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. मागणीपत्रात इतरही मागण्या केलेले आहेत.

विशेषता शेती व्यापारातील हस्तक्षेप थांबावा, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य द्यावे, अतिवृष्टी व विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे अशाही मागण्या करण्यात आल्या. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुंबईत २३ जानेवारीला धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात नामदेवराव जाधव, तेजराव मुंडे,बाळासाहेब जाधव, दामोदर शर्मा, एकनाथ थुट्टे, भानुदास घुबे, समाधान कनखर आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.