भारतीयांचे अस्तित्व धोक्यात! बुलडाण्यात धनंजय देसाईंचे वक्तव्य

 
yuhfv
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीयत्व धोक्यात!, असा सूचक सल्ला आज २ जानेवारीला धनंजय देसाई यांनी दिला.  हिंदू समाज संघटनेच्या वतीने आयोजित मोर्चासाठी आले असताना, मोर्चाला संबोधित करण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधतांना धनंजय देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले की,
 भारतीयांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. लव जिहाद, गोहत्या बंदी, धर्मांतरण विरोधी कायदा व्हावा, यासाठी जन आक्रोश मोर्चा जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. भारताची सांस्कृतिक, धार्मिक हानी झाली आहे. ही हानी भरून काढण्यासाठी १०० कोटी हिंदूंनी आपली कूस बदलली आहे. १९४७ ला ज्या धर्मांध तत्वांनी भारताचे विभाजन केले. त्या खंडित भारत भूमीची पूर्णतः सुरक्षितता व्हावी, जात- धर्म -पंथ या पलीकडे जाऊन राजनैतिक मतभेद मिटवून हिंदू हिताचे राजकारण व्हावे अशी अपेक्षा धनंजय देसाईंनी बोलून दाखवली.