धर्मप्रसाराच्या नावाखाली धर्मांतरण आणि बुवाबाजी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल! गोरेगावला सुरू होता खेळ! बुलडाणा लाइव्ह ने स्टिंग ऑपरेशन करून प्रकरण आणले होते चव्हाट्यावर..!!

 
bvmhg
साखरखेर्डा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव फाट्यावर विनापरवाना अनेक वर्षांपासून बुवाबाजीच्या नावाखाली धर्मांतरणाचा खेळ सुरू होता. बुलडाणा लाइव्ह ने स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. त्यानंतर हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत हा खेळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. तशी तक्रार साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती . या तक्रारीवरून पोलिसांनी काल, २८ जुलै रोजी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सिंदखेराजा तालुक्यातील गोरेगाव फाट्यावर प्रार्थनेच्या नावाखाली दर रविवारी आजारी महिला व पुरुषांची तपासणी व उपचार केले जात होते . आलेल्या रुग्णांच्या डोक्यावर तेल लावून ' आम्ही तुम्हाला असाध्य अश्या रोगांपासून मुक्त करतो ' अशा भूलथापा दिल्या जात होत्या . लाखो रुपये किमतीच्या जमिनीवर खूप मोठे बांधकाम करण्यात आले होते . तेव्हा यांच्याकडे एवढा पैसा कोठून येतो ? याची चौकशी व्हावी म्हणून बजरंग दल , विहिंपने यावर आक्षेप घेतला होता .

दरम्यान तातडीने प्रभारी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस . यांनी साखरखेर्डा गाठून शांतता समितीच्या बैठकीत चौकशीअंती कारवाईचे आदेश दिले होते. बैठकीत पोलीस अधीक्षक दत्त , उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दोन्ही गटांच्या बाजू समजून घेत योग्य कारवाईचे संकेत दिले  होते . दरम्यान आदित्य तिवारी यांच्या तक्रारीवरून दिलीप कव्हळे , नीलेश कव्हळे विकास गोफणे यासह दहा जणांवर जादूटोणा कायदा कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.