कोरोना महामारीत मायबाप गेले, सर्वस्वचं हरवले, आभाळ कोसळले !आशा फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या "त्या" अनाथांना शब्द पाळीत दिला मायेचा आधार !

खा.वासनिकांच्या हस्ते उच्च शिक्षणासाठी दोघांना प्रत्येकी १ लाख तर चौघांना प्रत्येकी ५० हजाराचे दिले धनादेश.    

 
dfg

चिखली:( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  कोरोना महामारीने जगाच्या पाठीवर नैसर्गीक कहर करीत मृतदेहांचा खच्च पाडला होता, या मुत्यू तांडवातुन बुलडाणा जिल्हाही सुटला नाही. जिल्हयात कोरोनाने आई-वडील, आजी आजोबांचे पालकत्व गमावलेल्या तब्बल ७ कुटूंबातील  १५ निराधार झालेल्या निरागस बालक,बालीकांना शैक्षणीक व संगोपालना करीता त्यांच्या जिवनात आशेचा किरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. मुकूलजी वासनिक हे अध्यक्ष तथा बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे सचिव असलेल्या  सामाजिक स्तरावर कार्य करणा-या ‘‘आशा फाउंडेशन’’ ने या बालकांना  दत्तक घेत त्यांचे शिक्षण व संगोपालनाची जबाबदारी दत्तक स्वरूपात घेतली होती. दिलेला शब्द पाळीत फाउंडेशनने नांदुरा येथील भारतजोडो यात्रेच्या आढावा बैठक प्रसंगी खा.मुकूल वासनिक यांच्या हस्ते उच्च शिक्षणासाठी दोघांना प्रत्येकी १ लाख रूपये तर चौघांना प्रत्येकी ५० हजार रूपयाचे धनादेश देत आर्थीक दुष्टया मदतीचा हात दिला . यामुळे पालकत्व गमावलेल्या या निरागस बालकांवर आभाळ कोसळलेल्या दुःखाला मायेची उब मिळाल्याने त्यांचे संगोपालन व शैक्षणीक वाट सुकर झाली आहे.  

आशा फाउंडेषनने दत्ताक घेतलेल्या १५ बालकांपैकी उच्च शिक्षण घेत असलेल्या मलकापुरच्या प्रशांत नगरातील विद्यी रविंद्र शर्मा व प्रणव रविंद्र शर्मा या दोघांना प्रत्येकी १ लाखाचा तर १३ ते १५ वर्ष वयोगटातील लांडणापुर (ता. संग्रामपुर ) येथील आम्रपाली राजु सोनुने, आचल राजु सोनुने,तसेच सुटाळा (ता. खामगांव) येथील प्रियांशी अमोल भाग्यवंत व जानव्ही अमोल भाग्यवंत या चौघांना प्रत्येकी ५० हजार रूपयाचे धनादेश खासदार मुकूल वासनिक यांच्या हस्ते, माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. जिल्हयातील पालकत्व गमावलेले सात कुटूंबातील १३ बालके १५ वर्ष वयोगटापेक्षा लहान असुन ते प्राथमीक शिक्षण घेत आहेत.

तर २ बालकांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेष घेतला आहे. त्यापैकी एक एम.बी.बी.एस. ला शिक्षण घेत आहे तर दुसरी बालीका ही चार्टेट अकाउंटंट चे शिक्षण घेत आहे.  उच्च  शिक्षण घेणाऱ्या दोघांना प्रत्येकी १ लाख रूपये मदत शिक्षणासाठी देण्याचे ठरले होतेे. तर उर्वरीत १३ बालकांना शिक्षण व संगोपनासाठी प्रत्येकी ५० हजार रूपये देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सदरहु बालकांना पुढील शिक्षणासाठी मदत करून त्यांच्या जगन्याला उभारी देण्याच्या दृष्टीकोनातुन आशा फाउंडेशनच्या वतीने व्यवसायीक प्रशिक्षित करण्यात येणार आहेत. आशा फाउंडेशनच्या बैठकीत सदर निर्णय घेतला त्यावेळी फांउडेशनचे अध्यक्ष मुकुल वासनिक, उपाध्यक्षा सौ.पुष्पाताई बोंडे , कोषाध्यक्ष माजी आमदार बाबुरावजी पाटील, सचिव राहुल बोंद्रे, विश्वस्त मुक्त्यारसिंग राजपुत, विजय अंभारे, संजय राठोड,सौ. सुनिताताई गावंडे यांची उपस्थिती होती.