बोराखेडीत हातभट्टी दारूचे ४ अड्डे उध्वस्त! बलडाण्यात मात्र हातभट्ट्या पेटलेल्याच!

ग्रामीण भागात हातभट्टी दारू गाळण्याच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी कारवाई करूनही ते व्यावसायिक कारवाईला जुमानत नसल्याची वस्तुस्थिती आहे.गुन्हे दाखल करूनही अटक केलेल्या गुन्हेगारांना जामीन मिळतो व त्यांना कायद्याचा धाक राहिला नाही. हातभट्टी दारू प्रकरणात शिक्षा लागलेल्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. परंतु व्यवसायिकांचे परिवर्तन करणे गरजेचे आहे.
या धंद्यापासून परावृत्त करण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा पोलीस दल यामध्ये कुठेतरी कमी पडत आहे. परंतु तत्कालीन एलसीबी प्रमुख बळीराम गिते यांची बोराखेडी ठाणेदार पदी नियुक्ती होताच त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला. त्यांचा दरारा कायम आहे. त्यांच्या आदेशावरून आरोपी किसन गजानन ठाकरे, रिता संतोष माळी, पर्वता विश्वनाथ गायकवाड, सावित्री सुनील मोरे यांची हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. एकूण ५०६५० रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य यावेळी नष्ट करण्यात आले. या आरोपींवर दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. असे असली तरी बुलडाण्यात हातभट्टी दारू गाळण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु कारवाई होत नाही असा आरोप जागृत जनतेतून होत आहे.