खाकी हवी तर गाजवा मैदान! जिल्ह्यातल्या ५१ जागांसाठी ४,४४६ अर्ज ; सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत भरती प्रक्रिया सुरू

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ५१ जागांसाठी बुलडाण्यात उमेदवारांची मैदान चाचणी पार पडत आहे.'खाकी साठी काही पण' या दृष्टीकोनातून उमेदवार मैदान गाजवत आहेत. पहिल्या दिवशी २६६ दुसऱ्या दिवशी २६८ उमेदवारांची मैदानी चाचणी झाली असून ३३ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

खाकी वर्दीसाठी जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील तरुणांनी आधी  सराव केलेला आहे. पोलीस अंमलदार होण्याचे स्वप्न अनेकांनी रंगविले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५१ जागांसाठी ४,४४६ अर्ज आले होते. मैदानी चाचणीला पहिल्या दिवशी ३३६ उमेदवार दाखल झालेत परंतु ७० उमेदवार बाद झाले. त्यामुळे २६६ उमेदवारांची मैदानी चाचणी झाली. दुसऱ्या दिवशी ३०१ उमेदवारांनी चाचणीसाठी हजेरी लावली. त्यापैकी ३३ उमेदवार बाद झाल्याने २६८ उमेदवारांनी निवड चाचणी दिली. पुढील आठ दिवस ही भरती प्रक्रिया पार पडत असून, यासाठी २५ सीसीटीव्ही कॅमेरे व ४ विशेष पथक दक्ष आहेत.