INFO कारल खाल्ल्यानंतर चुकनही करू नका "या" पदार्थांचे सेवन! अन्यथा...

 
karl
बुलडाणा(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): कारल चवीने असते कडू मात्र आरोग्यासाठी फारच गुणकारी. कडु असल्याने काहींना कारल्याची भाजी आवडत नाही मात्र काही जण आवडीने कारल्याची भाजी खातात. कारल्याची भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय गुणकारी असते. याशिवाय बद्धकोष्ठता ( पोट साफ न होणे), अपचन, पोटदुखी या आजारांनी त्रस्त असल्यास डॉक्टर कारल्याची भाजी खायचा सल्ला देतात. मात्र कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर काही पदार्थांचे सेवन हे तुमच्या अडचणीत वाढ करणारे ठरू शकते. चला तर जाणून घेऊन कारले खाल्ल्यानंतर काय खाऊ नये..

दूध: 
 कारले खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नये. तसे केल्यास तुम्हाला पोटासंबधी त्रास होऊ शकतात. कारले खाल्ल्यानंतर दूध घेतल्यास पोटात जळजळ, बद्धकोष्ठता आणि पोटात वेदना होऊ शकतात.त्यामुळे तुम्हाला आधीच पोटासंबधी अडचणी असतील तर कारल्यानंतर दूध घेऊच नका..!

मुळा:
कारल्याची भाजी खाल्ल्यानंतर मुळा किंवा मुळ्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ खाऊ नका. कारल्याचे आणि मुळ्याचे गुणधर्म भिन्न आहेत. कारल्यासोबत किंवा नंतर मुळा खाल्ल्यास घशात कफ, ऍसिडिटी होऊ शकते. त्यामुळे कारल्यासोबत मुळा खाऊच नका..

दही
अनेक लोकांना जेवणासोबत दही नसेल तर त्यांचे जेवणच होत नाही. मात्र कारल्यासोबत तुम्ही दही खात असाल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कारल्यासोबत किंवा नंतर दही खाल्ल्यास त्वचेचे आजार होण्याची दाट शक्यता असते.