पावसामुळे घरांची पडझड! अनेकांच्या घरात पाणी घुसले; प्रशासन झोपले मात्र देवानंद पवार धावले मदतीला..!!

 
vbgvj
जानेफळ (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या काही दिवसांपासून मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. वरवंड उपविभागात घाटनांद्रा व बोथा गावात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला.  अनेक घरांची पडझड झाली..शेतात पाणी साचले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. अशा परिस्थितीत प्रशासनाने तात्काळ पंचनामे करणे अपेक्षित असताना पंचनामे तर सोडाच अधिकाऱ्यांनी भेटी देखील दिल्या नाहीत..मात्र शेतकरी संकटात  असताना मदतीला धावून आले ते देवानंद पवार!

मेहकर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले आहे. सोयाबीन ,कपाशी, ज्वारी ,मुंग , उडीद या पिकांवर अळीने हल्ला चढवल्याने  जानेफळ सह वरवंड भागातील शेतकरी त्रस्त आहे. बोथा गावातील सहदेव सुडोकार यांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने देवानंद पवार यांनी व्यक्तिगत पातळीवर आर्थिक मदत केली आहे.

दरम्यान नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जानेफळ सह वरवंड उपविभागात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देवानंद पवार यांनी केली आहे. नुकसानग्रस्त भागात पाहणी करतेवेळी माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव ठाकरे, नामदेव राठोड, राजेंद्र गायकवाड, दिलीपराव राठोड, आकाश दाभाडे, तुकाराम राठोड, सहदेव डवंगे, रवी राठोड, कैलास बुंदे, महादेव लाड, सोपान नागोलकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
  
प्रशासनावर नागरिकांचा रोष...
  दरम्यान घाटनांद्रा व बोथा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ नये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही . तहसीलदारांनी साधा फोन करून विचारपूस सुद्धा केली नाही. त्यामुळे प्रशासनाप्रती नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.