गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट! आज बुलडाण्याचे तापमान ४१.५ डिग्रीवर

 
87564
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : २८ एप्रिलपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात उष्णतेची लाट राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. याचा प्रत्यय आज, २६ एप्रिलला हजारो बुलडाणेकरांना आला.
यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाला बुलडाणा शहराने पुन्हा गवसणी घातली. यामुळे लाखावर बुलडाणा शहर व परिसरवासी त्राहिमान झाल्याचे दिसून आले. यंदाच्या उन्हाळ्यात दोनदा ४१.५ डिग्री सेल्सियस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. आज बुलडाणा शहरातील तापमापकाने आज पुन्हा हा आकडा गाठला. उद्या बुधवारी व गुरुवारी तापमान हा आकडा पार करते का? हा तप्त सवाल यानिमित्ताने चर्चेला आला आहे.