जिजाऊ सृष्टीच्या विकास आराखड्याकडे सरकारचे दुर्लक्ष!सुप्रिया सुळे यांचा आरोप

 
Pawar
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ जगासाठी ऊर्जा स्त्रोत आहे. या जन्मस्थळाच्या उत्थानासाठी आघाडी सरकार प्रयत्नात होते व आहे. परंतु कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात आघाडी सरकार गेले आणि ईडी सरकार आले. दरम्यान सिंदखेड राजा जिजाऊ स्थळाचा विकास आराखड्याचे काम संथगतीने सुरू आहे.या ईडी सरकारचे ऐतिहासिक वास्तू संदर्भात दुर्लक्ष दिसून येत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. ई म्हणजे एकनाथ डी म्हणजे देवेंद्र अर्थात ईडी सरकार असल्याची भावना सुळे यांनी व्यक्त केली.

त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा  येथील जिजाऊ सृष्टी वर आल्या असत्या माध्यमांशी बोलत होत्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जिजाऊ सृष्टीचा कायापालट करण्यासाठी कोरोना पूर्वी मास्टर प्लॅन आखला होता. त्यांनी बारकाईने पाहणी केली होती. सिंदखेड राजा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याकरिता वाटेल तेवढा निधी देण्याची तयारी सुद्धा केली होती. संबंधित विभागांना सूचना देखील केल्या होत्या. परंतु आघाडी सरकार गेले व ईडी सरकार आले. त्यांचे दुर्लक्ष होत असल्याची शोकांतिका आहे, असे ही सुप्रिया  सुळे म्हणाल्या.