बुलडाण्याजवळच्या देऊळघाट मध्ये पकडला १८ लाखांचा माल ! एलसीबी व बुलडाणा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 
hfhj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गणेशोत्सव काळात अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवून या. या कामासाठी जिल्हास्तरीय तीन पथकांचे गठण करण्यात आले असून "त्या" धंद्याना चाप बसविण्याची जबाबदारी या तीन पथकांकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान बुलडाण्याजवळच्या देऊळघाट मध्ये तब्बल १८ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा व बुलडाणा ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही धडाकेबाज कारवाई केल्यानंतर अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

 मोताळा तालुक्यातल्या वाघरूळ मार्गे एक टाटा कंपनीची गाडी देऊळघाट येथे गुटख्याची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे देऊळघाट येथे रस्ता अडवून संशयित गाडीची तपासणी केली असून त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्याची किंमत जवळपास ८ लाख रुपयांच्या घरात असून गुटख्याची वाहतूक करणारी गाडी व १ मोबाईल असा १८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शेख सलीम शेख इस्माईल (५४, रा. आनंदनगर,चिखली) हा देऊळघाटच्या शेख शकील शेख सत्तार याला देणार होता. या दोघांविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हि कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया,अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गीते व बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या आदेशाने सपोनि मनीष गावंडे,सपोनि सदानंद सोनकांबळे,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेका रामविजय राजपूत, दीपक लेकुरवाळे, पोना विजय वारुळे, सतीश जाधव, संभाजी असोलकर यांनी केली.