बुलडानेकरांसाठी खुशखबर! येळगाव धरणात 10 महिने पुरेल इतके पाणी जमले !!

 
buldanadharan
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा); दर पावसाळ्यात कमी अधिक बुलडाणा शहरवासीय दोनच प्रश्न विचारतात. ते म्हणजे येळगाव मध्ये किती पाणी? अन किती महिने पुरेल??  यंदाही हेच प्रश्न होते. 

याचे उत्तर आहे की आज 14 जुलैला संध्याकाळी  येळगाव धरणात 63 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. काल हाच साठा 58 टक्के इतका होता. म्हणजे काही तासांतच जलसाठ्यात भरीव वाढ झाली आहे. येळगाव वर करडी नजर ठेवून असणारे बुलडाणा पालिकेचे अभियंता राजू गायकवाड यांनी बुलडाणा लाईव्ह ही गुड न्यूज दिली. या धरणाची जल साठा क्षमता 12.14 दश लक्ष घन मीटर इतकी असून सध्या धरणात 7.75 दलघमी इतका जलसाठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.