बुलडाणा जिल्हावासियांसाठी गुड न्यूज! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा निर्णय! जिल्ह्यातील "या" कामासाठी ३७० कोटींची घोषणा!

 
shinde
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज २७ जुलै रोजी झालेल्या ( दोघांच्या) मंत्रिमंडळ बैठकीत बुलडाणा जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी देणारा निर्णय घेतलाय. लोणार सरोवराच्या विकास आणि संवर्धनासाठी ३७० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकामी २०० कोटी रुपयांची घोषणा केली होती त्यात एकनाथ शिंदे यांनी १७० कोटी रुपयांची वाढ केली आहे.

याआधी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी २०० कोटींच्या निधीची घोषणा केली होती. लोणार सरोवराचा विकास हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या जात होता. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाची सध्या चर्चा रंगत आहे. उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला खतपाणी घालण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे बोलल्या जात आहे. 

लाखो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झाली. तज्ञांच्या मते २० लाख टन वजनाची उल्का वेगाने पृथ्वीवर आदळली  आणि त्यामुळे १.८ व्यासाचा आणि २०० मीटर खोलीचा गड्डा तयार झाला. खाऱ्या पाण्याचे हे सरोवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक लोणार येथे येतात.