Good News ! जिल्ह्याला मिळाले 8 नायब तहसीलदार! कामकाज सुरळीत होण्याची चिन्हे: रिक्त पदामुळे प्रसाशन झाले होते प्रभावित

 
adhikari
बुलडाणा( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पदोन्नतीमुळे अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांना न्याय मिळाला असतानाच जिल्ह्याला एकाचवेळी 8 नायब तहसीलदार मिळाले. यामुळे तहसील कार्यालयातील प्रामुख्याने निवडणूक कक्षाचे कामकाज सुरळीत होणार आहे.

जिल्ह्यातील 13 तहसील मधील नायब तहसीलदारांच्या रिक्त पदामुळे कामकाज प्रभावित झाले होते. यातही निवडणूक कक्षाचे कामकाजावर गंभीर परिणाम झाला होता. मात्र आता जिल्ह्याला एकाचवेळी 8  एनटी मिळाल्याने कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान पदोन्नत अधिकाऱ्यांना विविध कामांची जवाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन विभागाचे कामकाज अत्यंत प्रभावीपणे करणारे दीपक शिरसाट यांची शेगाव तहसील मध्ये निवासी नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे.

त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आहे. बुलडाणा तहसीलचे प्रकाश डब्बे यांना तिथेच संगायो ची जवाबदारी देण्यात आली आहे. जी जी बोरले हे यांना खामगाव तहसील मध्ये निवडणूक,  एस एस धोंडारकर यांना  सिंदखेड राजा मध्ये निवडणूक, आर जी काळे यांना लोणार मध्ये निवडणूक, श्रीमती ए एस नारखेडे याना नांदुरा मध्ये निवडणूक, एम सी गायकवाड यांना जळगाव मध्ये निवासी नायब तहसीलदार, एस जी टाके याना चिखलीत निवडणूक तर ए डब्ल्यू पिंपरकर याना शेगाव तहसील कार्यलयात संगायो ची जवाबदारी देण्यात आली आहे.