जिल्ह्यात दारूला दे दणका! यंदा 1256 गुन्हे;1199 आरोपींना केली अटक! तब्बल दीड कोटींपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त

बुलडाणा जिल्ह्यात अवैध दारूचा महापूर वाहत असल्याचे गंभीर चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पारंपरिक पद्धतींबरोबर आता खबऱ्यांचे नेटवर्क आणि नव्या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे तस्करी रोखण्याचा उपाय शोधला आहे. या अंतर्गत डिसेंबर अखेर तब्बल 1256 गुन्हे नोंदवून 1199 आरोपींना अटक करण्यात आली. तर 16,060654 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बनावटीच्या दारूला अधिक पसंती दिली जाते. ही दारू कमी पैश्यात उपलब्ध होते. त्यामुळे अनेकदा बाहेर जिल्ह्यातील दारूची तस्करी करण्यात येते आणि राज्यात त्याची जादा दराने विक्री करण्यात येते. यामुळे राज्य सरकारचा महसूल बुडतो. या घटनांना पायबंद करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वाढणारी तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात खबऱ्यांचे जाळे उभे केले आहे. त्यांच्या माध्यमातून अवैध दारूच्या तस्करीची माहिती मिळताच सापळा रचणे, छापा टाकून कारवाई करण्यात येत आहे.
कारवाईवर दृष्टीक्षेप
1 जानेवारी ते 20 डिसेंबर दरम्यान एकूण 1250 गुन्हे दाखल आहेत. तर 1199 आरोपींना अतक्य झाली.88 वाहन जप्त करण्यात आली. न्यायाधीशांनी 1,66,500 रुपयांचा दंड केला.ढाब्यावरील कारवाई करून 247 गुन्हे दाखल केले आहेत. पर बनावट दारूचे एकूण 3 गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये बल्क लिटर विदेशी दारू तर 5901 बाल लिटर देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच परराज्यातील 315 लिटर दारू, 379 बल्क लिटर बियर,8368 लिटर हातभट्टीची दारू
,74 मॅट्रिक टन काळा गूळ,189 लिटर ताडी व 181293 लिटर रसायन असा एकूण 16060654 रुपयांच्या मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली.