ग्रामपंचायतींच्या शंभरावर रिक्त जागांसाठी लवकरच घमासान! मतदार यादी कार्यक्रम जाहीर; ५ मे रोजी अंतिम यादी

 
588
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या शंभराहून अधिक जागांसाठी लवकरच लढती रंगणार असून, यासाठी मतदारयादी कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. घोषित कार्यक्रमानुसार ५ मे रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 

निवडणूक विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. लवकरच निवडणुका होऊ घातलेल्या विविध ग्रामपंचायतींमधील सुमारे १०० ते १२०  दरम्यान इतक्या जागा सध्या रिक्त आहे. पैकी नेमक्या किती जागांसाठी निवडणूक लागणार हे सध्या अनिश्चित आहे. मात्र या ठिकाणच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार असल्याने मतदार याद्या अद्ययावत असणे आवश्यक ठरते. यामुळे ५ जानेवारी २०२२ हा दिवस ग्राह्य धरून आयोगाने मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा आहे कार्यक्रम
निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्या स्वाक्षरीने हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २८ एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या याद्यांवर २८ एप्रिल ते ४ मे दरम्यान हरकती व सूचना दाखल करण्यात येतील. ५ मे रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार प्रसिद्ध करण्यात येणार आहे.