GOOD NEWS कामगारांच्या निधीत दुपटीने वाढ होणार! आमदार श्वेताताई महाले यांचा पाठपुरावा; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे संकेत...

 
mahale
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बेरोजगारीची कुऱ्हाड आणि  मोजके पैसे या समस्येला  कामगार सध्या तोंड देत आहेत. एकीकडे महागाई झपाट्याने वाढत असून, दुसरीकडे,वेतनात अपेक्षित वाढ होत नाही.त्यामुळे कामगारांसमोर अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या. त्यांचा जगण्याचा संघर्ष जटील होत आहे. दरम्यान कामगारांचा हा प्रश्न आमदार श्वेताताई महाले यांनी रेटला असता, राज्यातील लाखो संघटित कामगारांच्या कुटुंब आणि पाल्यांसाठी कामगार मालक आणि शासनासाठी त्रिसदस्य निधीमध्ये दुपटीने वाढ करण्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आमदार श्वेताताई महाले यांना दिले आहे.

आ.श्वेताताई महाले यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या आस्थपनेतील कामगारांच्या विविध  मागण्यांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मुंबई येथे आश्वासित केले. कामगारांच्या ८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे कडे आ.श्वेताताई  महाले यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.

कोट्यावधी कामगारांना होणार लाभ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या निधीत दुपटीने वाढ होणार असल्याने कामगार कल्याण निधी १९५३ नुसार येणाऱ्या सर्व आस्थापना,एसटी महामंडळ,सर्व महामंडळ, सहकारी बँक, सहकारी सूत गिरणी, सहकारी पत संस्था , भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र संस्था अधिनियम १९६० अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना फॅक्टरी ॲक्ट   १९४८ नुसार येणारे सर्व उद्योग,सर्व एमआयडीसी उद्योग, आणि ज्या आस्थापनेत ५ पेक्षा जास्त कामगार काम करतात अशा सर्व आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कोट्यावधी कामगारांना,त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे.या निधीत दर ३ वर्षांनी वाढ करावी असे असताना गत १६ वर्षापासून या निधीत वाढ झालेली नव्हती. या निधीत कामगार हिस्सा २५ रू मालक हिस्सा ५० रू आणि शासनाचा ७५ रू असा हिस्सा आता कपात केला जाणार आहे. दरम्यान
आता पर्यंत अर्धवेळ कर्मचारी ही अतिशय तूटपुंज्या पगारामध्ये काम करत होते. या कर्मचाऱ्यांची पगारवाढीची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. अर्धवेळ असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांसारखा किमान अर्धा पगार देण्यात यावा ही  मागणी देखील यावेळी समोर ठेवण्यात आली असून याला कामगार मंत्री  सुरेश खाडे यांनी अनुकूलता दर्शविली आहे.