GOOD NEWS! जिल्ह्यातील ७ एके झाले ' साहेब' !!

 
fgfb
 बुलडाणा( विशेष प्रतिनिधी) अनेक दिवसांपासून आतुर प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील ७  अव्वल कारकून प्रवर्गांतील कर्मचाऱ्यांना अखेर काल गुड न्यूज मिळाली! आजवर जी हुजूर , जी मालिक आणि हो साहेब करणारी ही मंडळी अखेर आता साहेब झालेत! ...
होय! आजवरच्या  दीर्घ सेवेनंतर हे कर्मचारी आता नायब तहसीलदार झाले असून त्यांना या गुड न्यूज आणि नियुक्तीचे आदेश काल २७ जुलै २०२२ च्या मुहूर्तावर प्राप्त झाले.  यामध्ये बुलडाणा तहसीलचे प्रकाश डब्बे यांच्यासह सी.जी. टाके, ए. डब्ल्यू. पिंपरकर, डी. ए. शिरसाट, एस.एस. धोंडरकर, ए. एस. नारखेडे आणि एम एस गायकवाड यांचा समावेश आहे. प्रकाश डब्बे याना जिल्हाधिकारी कार्यालयातील सांगायो  कक्षा चा कार्यभार देण्यात आला आहे.