विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही! आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांचा शेळगाव आटोळ वासियांना शब्द! १० लक्ष रुपयांच्या सभामंडपाचे केले भूमिपूजन

 
ssss
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सत्ता असो किंवा नसो आपण विकासकामांसाठी निधीची कधीही कमतरता पडू देणार नाही. ज्या गावातील,परिसरातील लोकांनी मला भरभरुन दिले त्यांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबध्द आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा सिंदखेराजा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेळगाव आटोळ (ता.चिखली)  येथे आज बुधवारी डॉ. शिंगणे यांच्या हस्ते स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत १० लक्ष रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न झाले, यावेळी ग्रामस्थांना संबोधित करताना ते बोलत होते.

शेळगाव आटोळ येथील हनुमान मंदिरासमोर सभामंडप करण्याची गावकऱ्यांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेत स्थानिक आमदार विकास निधीतून १० लक्ष रूपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन आ.डॉ. शिंगणे यांनी केले. यापुढेही विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आपले जिवनध्येय आहे असे डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ, शेळगाव आटोळ चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा गावकरी मंडळी उपस्थित होते.