BIG BREKING जिल्ह्यात निघाले चार पेशंट; आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर
Dec 24, 2022, 19:18 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात साथरोगांचा उद्रेक होत आहे. कोविडची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पण आज आलेली माहिती धक्कादायक आहे.
यावर्षी जुलै,ऑगस्ट,नोव्हेंबर महिन्यात अनेक रुग्ण आढळून आले होते. दरम्यान या डिसेंबर महिन्यात कोविडची शक्यता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु आज,२४ डिसेंबरला रुबेलाचा १ आणि गोवरचे ३ असे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी, मेहकर तालुक्यातील जानेफळ, नांदुरा तालुक्यातील धोलड येथे गोवरचे रुग्ण आढळले. तसेच शेगाव तालुक्यातील गायगाव येथे एक रूबेलाचा रुग्ण आढळून आला आहे. गोवर रूबेला आणि कोविड साठी जिल्हा आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली असून, उपाययोजनांची तजबीज सुरू आहे.