वडीलांनाच दिली तलवारीने कापून टाकण्याची धमकी! साखरखेर्डा पोलिसांनी घडवली अद्दल

 
4536
साखरखेर्डा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सिंदखेडराजा तालुक्यातील  गुंज येथे तलवारीचा धाक दाखवून गावात दहशत निर्माण करणाऱ्या मधुकर प्रल्हाद तुपकर (४२) याल पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

 गुंज येथे १७ एप्रिल पासून गावात मधुकर तुपकर हा तलवारीचा धाक दाखवून गांवातील लोकांना धमकावत होता. आज,१८  एप्रिल रोजी त्याने त्याच्या घरी वडिलांना तलवारीने कापून टाकण्याची धमकी दिली. दरम्यान प्रल्हाद तुपकर यांनी सदर प्रकाराची माहिती पोलिसांना देताच दुय्यम ठाणेदार सचिन कानडे आपल्या कर्मचाऱ्यांसह गांवात जाऊन निरिक्षण केले असता आरोपी मधुकर हा तलवार घेऊन फिरत असल्याचे दिसले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून तलवार जप्त केली. शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा  दाखल केला . तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे  यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलीस करीत आहेत.