डोणगावच्या ग्रामस्थांना चोट्टे म्हणणाऱ्या भ्रष्टाचारी ग्रामसेवकाच्या निलंबनासाठी आज पासून मेहकरात उपोषण!

 
mehakar
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डोणगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा प्रताप काही दिवसांपूर्वी समोर आला होता. सरपंचाला भ्रष्टाचाराचे धडे देत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. पैसे खाणे हा आपला अधिकारच असल्याच्या अविर्भावात तो बोलत होता. त्याने ग्रामस्थांना चोट्टे  म्हटले होते. त्याच्या निलंबनासाठी आज १५ सप्टेंबर पासून मेहकर पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र त्यावर अजून निर्णय न झाल्याने आजपासून साखळी उपोषणाचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.