शेतकरी म्हणाले, याला म्हणतात वाढदिवस..! शेवटपर्यंत समाजासाठीच.. योगेंद्र गोडेंचा कृतिरुप संकल्प! विविध समाजउपयोगी उपक्रमांनी साजरा झाला वाढदिवस! शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती

 
rthgh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शांत, संयमी आणि उच्चशिक्षित अशी ओळख असलेले भाजपचे जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांचा वाढदिवस काल, २५ मे रोजी जिल्हाभर विविध उपक्रमांनी साजरा झाला. २४ मे रोजी बुलडाणा शहरात  मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो गरजवंतानी तपासणी केली. त्यानंतर काल मोताळ्यातही मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी बुलडाणा येथील डॉ.राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयात भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा पार पडला. या मेळाव्याला बुलडाणा व मोताळा तालुक्यातून हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पजांब डख यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी "याला म्हणतात वाढदिवस" अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्यक्त केली. शेवटपर्यंत  समजासाठीच असा कृतिरूप संकल्प योगेंद्र गोडे यांनी वाढदिवसानिमित्त व्यक्त केला.

gode

पक्षी प्राण्यांच्या हालचालीने पावसाचा अंदाज खरा ठरतो. यंदा पाऊस चांगला होणार आहे. पाऊस अवघ्या १२ दिवसांवर आला आहे. शेतकऱ्यांनी कामे उरकून घ्यावी. जेव्हा पाऊस लवकर पडतो तेव्हा उत्पादन चांगले होते असे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याला संबोधित करताना पंजाब डख म्हणाले. गावरान आंबा बहरला,सर्वांनी पोटभर रस खाल्ला तेव्हा पाऊस समाधानकारक नसतो. मात्र  गावरान आंबा बहरला नाही, झाडाला कैऱ्या लागल्या नाहीत तेव्हा पाऊस दणक्यात येतो असे निरीक्षण पजांब डख यांनी नोंदविले.

कावळा घरटी न बांधता एखाद्या मडक्यात किंवा मातीच्या भिंतीच्या खोप्यात, किंवा ढिगाऱ्यात राहतो तेव्हा पाऊस जोरदार होतो असे पंजाब डख म्हणाले. यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉ. जायभाये यांनीसुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यानी पावसाचा अंदाज घेऊन व हवामानाचा विचार करून खरिपाची पेरणी जुलै अखेर पर्यंत केलीच पाहिजे.

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून शेती करावी असे डॉ. जायभाये म्हणाले. "शेतकरी हाच देशाचा अन् जगाचा खरा पोशिंदा आहे. शेतकरी टिकला तर सर्व काही शक्य आहे. त्यामुळे सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे..शेतकरी आहे म्हणून आपण आहोत". असे प्रतिपादन यावेळी जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांनी केले. कार्यक्रमाला शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नामदेवराव जाधव, डॉ. एफ.एफ, तारू, भाजप नेते विश्वनाथ माळी, भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, युवा मोर्चा चे सोहम झाल्ट, सुनील वायाळ, मोहित भंडारी यांच्यासह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.