अंचरवाडी, वसंतनगरचे शेतकरी रोह्यांच्या त्रासाला वैतागले! दोन दिवसांत पंचनामे झाले नाही तर बुलडाण्यात "या" कार्यालयाच्या आवारात घेणार सामूहिक गळफास!

 
dxgf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या आशेने खरिपाची पेरणी केली आहे. मात्र वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये अक्षरशः हैदोस घातल्याचे चित्र आहे. चिखली तालुक्यातील अंचरवाडी, वसंतनगर येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे रोह्यांनी मोठ्याप्रमाणात नुकसान केलेय. दोन दिवसांत या नुकसानीचे पंचनामे करा, रोह्यांचा बंदोबस्त करा अन्यथा बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात आम्ही सामूहिक गळफास घेऊन आत्महत्या करू असा इशारा शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिलाय.

अंचरवाडी, वसंतनगर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे मोठे नुकसान रोह्यांनी केलेय. एकदा एखादा कळप शेतात घुसला की अख्खी सोयाबीन फस्त करून टाकून. कर्ज काढून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे नुकसान कसे सोसायचे असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. २२ आणि २३ जुलै रोजी पंचनामे न झाल्यास आणि रोह्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही सर्व शेतकरी २४ किंवा २५ जुलैला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या झाडांना गळफास घेऊन आत्महत्या करू..आता बघा, तुम्हाला काय करायचे ते ठरवा असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. निवेदनावर सुनील परिहार, कृष्णा सपकाळ, कृष्णा  रंगलाल पवार, संतोष  भगवान कुऱ्हे, भास्कर मुकुंद चव्हाण, संतोष  मदन राठोड यांच्या सह्या आहेत.