शेतकऱ्यांनो सावध व्हा!लम्पि स्किन ची जिल्ह्यातल्या ६३जनावरांना बाधा ! एकाचा मृत्यू!! 'पशुसंवर्धन' अलर्ट मोड' वर

 
jgj
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील पशुधनासाठी  घातक संकट समजल्या जाणाऱ्या 'लम्पि स्किन ' या आजाराचा जिल्ह्यातील ६ तालुक्यात  प्रादुर्भाव झाला असून आजखेर ६३ जनावरांना याची लागण झाली. यातील एकाचा मृत्यू झाल्याची  खळबळजनक माहिती हाती आली आहे. 

 या आजाराने शेगाव, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, मलकापूर, जळगाव व मोताळा या तालुक्यापर्यंत मजल मारली आहे. शेगाव तालुक्यात सर्वाधिक २९ जनावरे बाधित झाली आहे. याशिवाय देऊळगाव राजा व जळगाव जामोद( प्रत्येकी १२) , मलकापूर ७, मोताळा३ अशी तालुकानिहाय बाधित जनावरांची संख्या आहे. सिंदखेदराजातही आजाराचा प्रादुर्भाव झाला असून  त्याचा अहवाल मिळणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त  डॉक्टर आर. एस . पाटील यांनी सांगितले. आजअखेर एका जनावराचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. 

लसीकरणाला गती

दरम्यान रोगाची व्याप्ती आणि धोका लक्षात घेता सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आल्याचे डॉ पाटील यांनी सांगितलं. लसीकरणाला गती देण्यात आली आहे.  आयुक्त आणि जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांच्या मार्गदर्शनात व बाजार समित्यांच्या सहकार्याने तूर्तास गुरांचे बाजार बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये देऊळगावराजा, खामगाव , मोताळा, मलकापूर, चिखली  , आसलगाव( जळगाव ) दुधा( बुलढाणा,) या मुख्य बाजारांचा समावेश आहे. अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी व पशु चिकित्सा केंद्रांना सतर्क करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.