खळबळजनक! अविवाहित तरुणी प्रियकरापासून प्रेग्‍नंट!!; बुलडाण्याच्या चांडक लेआऊटमध्ये करवला अवैध गर्भपात

 
868
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अविवाहित तरुणी प्रियकरापासून प्रेग्‍नंट झाल्यानंतर तिला बुलडाण्याच्या चांडक ले आऊटमध्ये नेऊन प्रियकराने अवैधरित्या गर्भपात करवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गर्भपात करवणाऱ्या दोघांविरुद्ध काल, २५ एप्रिलला गुन्हा दाखल झाला आहे.

कैलास गवई व निता कैलास गवई (रा. चांडक ले आउट बुलडाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. साईनाथ तोडकर यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बुलडाणा शहरातील एका तरुणीला प्रियकरापासून गर्भ राहिला. प्रियकर तिला घेऊन चांडक ले आऊटमधील कैलासच्या घरी गेला.

तिथे तिचा गर्भपात करवला. यासाठी कैलासने २० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. नंतर प्रियकराने तिला तिच्या बहिणीकडे वृंदावननगरात सोडले. कैलास गवई व त्‍याची पत्‍नी निता यांनी तिचा अवैध गर्भपात केला. कैलासकडे  बाॅम्बे नर्सिंग होम अॅक्ट, गर्भपात केंद्र नोंदणी पोलिसांना आढळली नाही. त्यामुळे कैलास, त्याची पत्नी निता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍यांना त्यांचा भाचा व तरुणीचा प्रियकर यांनी मदत केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक जयसिंग पाटील करत आहेत.

असे फुटले बिंग...
बुलडाणा शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे अवैध गर्भपाताची तक्रार प्राप्त झाली होती. त्‍या तक्रारीची चौकशी करण्यात आली. गर्भपात करवलेली मुलगी पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात नेली. तिथे तिची तपासणी केली असता तिचा गर्भपात झाल्याचे १९ एप्रिलला समोर आले होते. डॉक्‍टरांनी तिची विचारपूस केली तेव्हा कैलास गवईने तिचा गर्भपात केल्याचे तिने सांगितले होते.