रोजगार हमी! अर्धे तुम्ही अर्धे आम्ही!! विहिरीचे अनुदान न मिळाल्याने पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्याचे पाण्यात अर्ध नग्न आंदोलन

 
jhhjhj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शासनाच्या रोजगार हमी योजनेत सावळ्या गोंधळाची कमी नाही.'रोजगार हमी!अर्धे तुम्ही अर्धे आम्ही!!' असेच काही जिल्ह्यातील चित्र आहे. सदर योजनेतून मिळालेल्या विहिरीचे अनुदान लाभार्थ्याला मिळाले नसून, हे अनुदान रोजगार सेवकांच्या खात्यावरून त्यांचा थम घेऊन काढण्यात आल्याचा आरोप करीत वैतागलेल्या मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील लाभार्थ्यांने पेनटाकळी धरणाच्या पाण्यात आज अर्ध नग्न आंदोलन सुरू केले आहे. गणेश काळे असे या आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे.

             ghube

                         (जाहिरात👆)

जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न अधांतरी असल्याने, शेतकरी शेतात विहीर असावी यासाठी जीवाचे रान करीत आहे. शेतकरी शासनाच्या योजना चाचपडून प्रशासकीय उंबरठे झिजवतो. शासन योजना कार्यान्वित करते मात्र प्रशासन ही योजना पारदर्शक राबविते असे नाही. रोजगार हमी योजनेअंतर्गत लक्ष्मीबाई काळे या लाभार्थीला विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले.परंतु यामध्येही सावळा गोंधळ दिसून येत आहे. गणेश काळे या शेतकऱ्याची  लक्ष्मीबाई काळे यांच्या नावाने विहिरीसाठी २०१७ रोजी विहीर मंजूर झाली होती. दरम्यान गणेश काळे यांनी रोजगार हमी योजनेतून विहीर खोदून घेतली.

परंतु विहिरीवर मजूर दाखवून संपूर्ण पैसे दुसऱ्यांच्याच खात्यावर जमा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. विहीर खोदण्याचे अनुदान अद्यापही त्यांना मिळाले नाही. त्यांनी अनुदानासाठी मेहकर पंचायत समितीच्या बीडिओकडे खेटा घातल्या. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. काळे म्हणाले की,२९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात तक्रार केली मात्र चौकशी करण्यात आली नाही. मजुरांचे आयडीएफसीचे बँक खाते आहे. रोजगार सेवकाचे थम घेऊन बँक खात्यावरून पैसे काढण्यात आले. माझ्यावर अन्याय झाला असल्यामुळे आज सकाळपासून पेनटाकळी धरणात अर्ध नग्न आंदोलनाला सुरुवात केल्याचे गणेश काळे म्हणाले.