हिवरा गडलिंग परिसरात सोयाबीनवर "येलो मोजेक" व्हायरस चा प्रभाव! तात्काळ उपाययोजना करून शेतकऱ्यांना मदत देण्याची सरपंच पूनम खरात यांची शासनाकडे मागणी!

 
sdfd
सिंदखेराजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील हिवरा गडलिंग परिसरात सोयाबीन वर येलो मोजेक व्हायरस चा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे गावातील शेकडो शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर कृषी विभाग व शासनाने तात्काळ उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी हिवरा गडलिंगच्या कर्तव्यदक्ष सरपंच पूनम खरात यांनी केली आहे.

हिवरा गडलिंग परिसरात ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या शेतात या घातक व्हायरस चा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे सोयाबीन अकाली पिवळे पडले असून त्याचा उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. विमा कंपन्यांनी व कृषी विभागाने याचे तात्काळ पंचनामे करावेत. विमा कंपनीच्या वतीने व महाराष्ट्र शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी सरपंच पूनम खरात यांनी केली आहे.