BIRTHDAY SPECIAL खा. प्रतापराव जाधवांनी शारंगधर बालाजींचा केला सपत्नीक अभिषेक! जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुखी ठेव म्हणाले...

 
jadhav
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा आज, २५ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे खा. जाधव यांनी आज,मेहकरच्या शारंगधर बालाजींचा सपत्नीक अभिषेक करून दर्शन घेतले.  या वतीने मंदिर प्रशासनाच्या वतीने खा. जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

   jadhav

 खा. जाधव यांच्या वाढदिवशी दरवर्षी शारंगधर बालाजींचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. आज, सपत्नीक त्यांनी शारंगधर बालाजींचा विधिवत अभिषेक करून आशीर्वाद घेतले.जिल्ह्यातला शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडला आहे. येणाऱ्या रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू दे. जिल्ह्यासह राज्यातील,देशातील शेतकऱ्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना खा. जाधव यांनी यावेळी केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी सुखी तर सर्व जग असेही यावेळी खा.जाधव म्हणाले.

     jadhav

             जाहिरात☝️