चिखलीत ८ व ९ मेला उडणार धुराळा! शंकरपाटांच्या सामन्यांत २ लाखांच्या बक्षिसाची लूट! निमित्त राहुल बोंद्रेच्या वाढदिवसा

 
bailgada
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):- जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत ८  व ९ मे रोजी शंकरपटाच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली खामगाव रोडवरील खामगाव चौफली परिसरातील मैदानात हे सामने रंगणार आहेत.

 चिखली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शंकरपटाच्या सामन्यात जनरल गट आणि गावगाडा गट असे दोन गट पाडण्यात आले आहेत. जनरल गटात प्रथम बक्षीस ४१ हजार रुपये, द्वितीय बक्षीस २१ तर तृतीय बक्षीस १५ आणि प्रोत्साहनपर बक्षीस ११ हजार व साडेसात हजार अशी एकूण १३ बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

गावगाडा गटात प्रथम बक्षीस ७ हजार, द्वितीय ५ हजार व तृतीय ३ हजार अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेवेळी राजेंद्र मनदाडे, रणजित राठोड,गणेश पळशीकर, दाभाडे व कुंडकर यांची पर्यवेक्षक म्हणून उपस्थिती राहणार आहे. शंकरपटात सहभागी होणाऱ्या व मुक्कामी राहणाऱ्या बैलगाडी चालक व मालकांची भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शंकरपटात जिल्ह्यासह परिसरातील बैलगाडा चालक, मालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.