या" कारणामुळे सिंदखेड राजा नगरपरिषदेचे कामकाज झालेय विस्कळीत!

 
sdf
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  राजमाता मा जिजाऊंचे माहेरघर असलेल्या सिंदखेडराजा नगरपरिषदेचे कामकाज काल, १ मे पासून विस्कळीत झाले आहे.  नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या  न्याय हक्क मागण्यासाठी शासनाविरुध्द लढा देण्यासाठी  १ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांनी तसे निवेदन नगराध्यक्ष सतीश तायडे यांना दिले आहे.


  नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या या  बेमुदत  कामबंद आंदोलनात नगरपरिषदेतील सर्व आस्थापना कर्मचारी, सफाई कर्मचारी ,अधिकारी सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामावर परतणार नाहीच अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने  सिंदखेडराजा नगरपरिषदेची सेवा विस्कळित झाली आहे .