विकृती..! बुलडाणा शहरातल्या जयस्थंभ चौकातील बैलजोडीचा पुतळा अज्ञातांनी केला उध्वस्त

 
7568
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा जयस्थंभ चौकातील बैलजोडीचा पुतळा  अज्ञातांनी उध्वस्त केला. आज, १९ एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली.
  बुलडाणा शहरातील जयस्थंभ चौकात २०१५ मध्ये तत्कालीन नगरसेवक दत्ता काकस यांच्या सौजन्याने बैलजोडीचा पुतळा उभारण्यात आला होता. १८ एप्रिलच्या रात्री कुणीतरी अज्ञात  लोकांनी तो पुतळा उध्वस्त केला. तो उध्वस्त कुणी आणि कशासाठी केला असेल याचे कोडे अद्याप उलगडले नाही. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.